सुहास राजदेरकर ( suhas.rajderkar@gmail.com)
‘शोले’ या १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची जादू आज ५० वर्षांनंतरसुद्धा कायम आहे. जय-वीरूची मैत्री, ठाकूरचा बदला, गब्बरची दहशत आणि गावकऱ्यांचा संघर्ष... या सर्व गोष्टी प्रेक्षकांना भावल्या. परंतु, या चित्रपटाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर असे लक्षात येते, की यातील अनेक प्रसंग, नियोजन, युद्धतंत्र याचे आपण करत असलेल्या गुंतवणुकीशी खूप साधर्म्य आहे. गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ‘शोले’ आपल्याला गुंतवणुकीचे काही अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवतो. त्या धड्यांचा मागोवा घेणारा हा लेख...