

Fuel Revolution or Fuel Shock? E20–E85 Ethanol Could Change Petrol Prices Forever!
eSakal
युद्धामुळे इंधनाची समस्या तीव्र झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय शोधत आहे. त्यातील एक म्हणजे इथेनॉलमिश्रित इंधनाला चालना देणे. यासाठी केंद्र सरकारने २२ ते ३० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील उत्पादनशुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी इंधनाचा वापर वाढवीत कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर वाढविल्यास काय होईल, यासंबंधी उत्सुकता निर्माण झाली आहे, म्हणूनच या प्रश्नाच्या विविध बाजूंची नोंद.