Premium|Ganeshotsav DJ Ban : ढोल-ताशा,‘डीजे’चं अर्थकारण

Dhol Tasha Restrictions : पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि ढोल-ताशांवरील निर्बंधाच्या मागण्या वाढत असताना, गोखले इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी या वादामागील अर्थकारण आणि समाजकारणाचा अभ्यास केला आहे.
Ganeshotsav DJ Ban

Ganeshotsav DJ Ban

esakal

Updated on

सध्या पुण्यात गणेशोत्सवात ‘डीजेवर बंदी आणा’, ‘ढोल-ताशा पथकांवरही निर्बंध आणा’ या मागण्यांनी जोर धरला आहे. वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी यावेळी हा प्रश्‍न लावून धरला आहे. मोर्चे काढून जीवघेण्या डीजेच्या आवाजाविरुद्ध आपला आवाज ठामपणे उठवला आहे, तर गणेशोत्सव मंडळं राजकारणी खाक्या घेऊन त्यावर ठाम आहेत. त्यांच्या या आग्रहामागचं अर्थकारण, समाजकारण नेमकं काय आहे, यावर पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या अर्थशास्त्र विभागाच्या पाच विद्यार्थिनींनी संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून समोर आलेली ही निरीक्षणे...

‘‘आई, लक्षात आहे नं आज आमचा ग्रुप जमतोय आपल्याकडे. ‘डीटीडीजे’साठी...’’ इति माझी जेन-झी कन्यका रिया आपल्या मिलेनियल आईला बजावून, दोन चाकांवर भुरर्कन कॉलेजला पळाली. दहा मिनिटं झाली असतील नसतील आणि मोबाइल स्क्रीनवर मेसेज झळकला ‘‘आई, बाय द वे, ‘डीटीडीजे’ म्हणजे गणपतीतली ‘ढोल-ताशा पथकं आणि डीजे’ हा आमचा प्रोजेक्ट हं! नाहीतर ‘डीडीएलजे’ची गाणी ऐकत बसशील,’’ असं म्हणून जीभ बाहेर काढलेल्या दोन-तीन इमोजी!

या मुलींनी ढोल-ताशा आणि डीजे या विषयावर प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय केलं असेल? या प्रश्‍नानं माझ्या मनात फेर धरला, पण म्हटलं, संध्याकाळी येतील तेव्हा कळेलच. ठरल्याप्रमाणे रियाबरोबर इरा, मधुरा, चेतना आणि तन्वी संध्याकाळी घरी आल्या आणि गरमागरम वडे खाता-खाता या विषयावर आमची चर्चा रंगली.

मधुरा : काकू, वडे मस्त झालेत!! थॅंक यू! आम्ही बसतो आता अहवाल लिहायला.

मी : अगं, थांबा जरा! कॉफी व्हायची आहे अजून. त्याआधी मला एक सांगा, तुम्हाला हा विषय का घ्यावासा वाटला? म्हणजे कसं आहे, की गणपती यायची वेळ झाली, की किमान महिनाभर आधी तयारी सुरू होते. ढोल-ताशा पथकं सराव करताना दिसतात. गणेशाच्या सुबक मूर्ती, पूजेचं सामान, सजावट, प्रसादाचे पदार्थ... सर्वत्र अगदी उत्साह तन्वी : ओसंडून वाहत असतो; पण त्या बिचाऱ्या गणराजाला आणि माझ्यासारख्या नागरिकांना मात्र आजकाल उत्सवापेक्षा उन्मादच जास्त दिसतो. डोळ्यावर येणारे लेझर दिवे, कानांचे पडदे फाटतील एवढ्या उंच ‘डीजे’च्या भिंती, बेधुंदपणे अंगविक्षेप करत नाचणारी तरुणाई यातून त्या बिचाऱ्या गणराजाला दरवर्षी जावं लागतं आणि त्याला आपणच जबाबदार आहोत. यावर कुणी काहीही करू शकत नाही, मग तुमचा हा खटाटोप कशासाठी?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com