Premium|Godrej industrial legacy : कुलूप-किल्ली ते जागतिक उद्योगसमूह; वाचा विश्वसनीयतेचे 'जेनेरिक नेम' बनलेल्या गोदरेजचा रंजक इतिहास

Godrej Group History : कुलूप-किल्लीच्या व्यवसायापासून सुरू झालेला आणि आपल्या उच्च गुणवत्तेच्या बळावर प्रत्येक भारतीय कुटुंबाचा विश्वास जिंकत देशातील एक प्रतिष्ठित ब्रँड बनलेल्या गोदरेज उद्योगसमूहाच्या आरंभीच्या कालखंडाची रंजक आणि प्रेरणादायी पूर्वपीठिका.
Godrej industrial legacy

Godrej industrial legacy

esakal

Updated on

सुधीर सेवेकर - seveker.sr@gmail.com

कुलूप-किल्ली तयार करण्याच्या उद्योगातून सुरुवात केलेला गोदरेज हा आता देशातील एक महत्त्वाचा उद्योगसमूह आहे. उच्च गुणवत्ता, सतत सुधारणा, तत्पर विक्रीपश्चात सेवा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा उद्योगसमूह अनेक उत्पादनासंदर्भात देशातील एक प्रतिष्ठित समूह बनला. त्या उद्योगसमूहाच्या आरंभीच्या कालखंडाची ही सुरस हकीकत...

गोदरेज म्हटले, की बहुतांश जणांना, खासकरून मध्यमवर्गीय माणसांना हमखास आठवतात ती गोदरेजची स्टील कपाटे. कारण ती गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून समाजात रुजलेली आहेत, घट्ट बसलेली आहेत. या कपाटांना वाणिज्य भाषेत ‘स्टोअरवेल’ असे संबोधले जाते. लोखंडी कपाट- सहा फूट उंचीचे, ज्यामध्ये कपडे टांगण्याची सुविधा आहे, दागिने, रोख रक्कम व अन्य मूल्यवान ऐवज ठेवण्यासाठी एक भरवशाची ‘सेफ’ म्हणजे तिजोरी आहे, शिवाय अन्य महत्त्वपूर्ण सामानासाठी तीन खण आहेत, असे कुलूप-किल्लीवाले लोखंडी किंवा स्टील कपाट म्हणजे ‘गोदरेज.’ गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून असे कपाट घरात असणे हे ऐश्वर्याचे तर लक्षण होतेच, शिवाय ते एक सामाजिक उच्च दर्जा दाखवण्याचेही प्रतीक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com