
अलिकडेच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे ७००० रुपयांनी प्रति १० ग्रॅमने खाली आली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १ लाख रुपयांवरून ९३००० रुपयांवर घसरला. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतील आर्थिक स्थिरता, अमेरिकन डॉलरची ताकद आणि कमी होत असलेली भू-राजकीय अस्थिरता यामुळे हा बदल झाला आहे.