

PM Kisan 24th Installment
ESakal
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून दर चार महिन्यांनी २,००० रुपयांचा हप्ता दिला जातो. म्हणजेच वार्षिक सहाय्य म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात ६,००० रुपये जमा केले जातात. या योजनेतील आतापर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असून आता २४वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत असून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.