Government Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News!, होळीपूर्वी 'महागाई भत्ता' वाढण्याची चिन्हं

Government Employees Likely to Receive DA Hike Before Holi : आठव्या वेतन आयोगाबाबतही समोर आली मोठी अपडेट ; सरकारी नियमांनुसार, महागाई भत्ता वाढ वर्षातून दोनदा सुधारित केली जाते.
Government Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News!, होळीपूर्वी 'महागाई भत्ता' वाढण्याची चिन्हं

esakal

Updated on

Dearness Allowance Increase Update : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, होळीच्या सणापूर्वी सरकार महागाई भत्त्यात (डीए) वाढ जाहीर करू शकते, असे वृत्त आहे. जर असे झाले तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात लक्षणीय वाढ दिसून येईल.  साधारणपणे, सरकार मार्चमध्ये वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्ता जाहीर करते, त्यामुळे सर्वांचे लक्ष सध्या सरकारच्या पुढील निर्णयाकडे आहे.

सरकारी नियमांनुसार, महागाई भत्ता वाढ वर्षातून दोनदा सुधारित केली जाते. जानेवारी ते जूनसाठी पहिली वाढ मार्चमध्ये जाहीर केली जाते. जुलै ते डिसेंबरसाठी दुसरी वाढ ही दसरा किंवा दिवाळीच्या आसपास जाहीर केली जाते.गेल्या वर्षी, सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ मंजूर केली होती, ज्यामुळे एकूण महागाई भत्ता ५८ टक्के झाला होता. यावेळीही कर्मचाऱ्यांना लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट काय? -

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनुसार आठव्या वेतन आयोगाची स्थापना तर केली आहे, परंतु त्याच्या शिफारशी लागू होण्यासाठी किमान दोन वर्षे लागू शकतात. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू होईपर्यंत, सातव्या वेतन आयोगाचे नियम लागू राहतील.

Government Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News!, होळीपूर्वी 'महागाई भत्ता' वाढण्याची चिन्हं
Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

दुसरीकडे आठव्या वेतन आयोगाने आपले काम सुरू केले आहे आणि कर्मचाऱ्यांचा अभिप्राय गोळा करण्यासाठी प्रश्नोत्तराचे सत्रही सुरू झाले आहे, जेणेकरून आगामी काळात नवीन वेतन रचनेत अधिक सुधारणा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com