

E-passport System India
ESakal
परदेशात प्रवास करण्यासाठी आणि भारतीय ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून काम करतो. भारत सरकारने पासपोर्ट सेवा कार्यक्रम (V2.0) सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरात ई-पासपोर्ट प्रणाली लागू करण्यात आली आहे. आतापासून भारतातील आणि परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये नवीन पासपोर्ट आणि नूतनीकरणासाठी फक्त चिप-सक्षम ई-पासपोर्ट जारी केले जातील.