

UPI payments
esakal
यूपीआय व्यवहारांवर एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याचा निर्णय परदेशी प्रभावातून किंवा दबावातून घेण्यात आल्याचा विरोधकांचा दावा केंद्र सरकारने बुधवारी पूर्णपणे फेटाळून लावला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.