
लवकरच जीएसटी कौन्सिल मोठ्या घोषणा करू शकते. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२% जीएसटी कर स्लॅब रद्द केला जाऊ शकतो, असे वृत्त आहे. जर असे झाले तर दूध, दही, पनीर, १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे, १००० रुपयांपर्यंतचे बूट, संरक्षित मासे, विटा, स्वच्छ ऊर्जा उपकरणे, कंडेन्स्ड मिल्क इत्यादी अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात. १२% कर स्लॅबमध्ये येणाऱ्या काही वस्तू १८% स्लॅबमध्ये देखील टाकल्या जाऊ शकतात. सरकारची इच्छा आहे की, दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू ५% कर स्लॅबमध्ये टाकल्या पाहिजेत.