
GST on Insurance Premium
ESakal
जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील कर शून्य करण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय आज, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला आहे. याला "दिवाळी भेट" म्हणत सरकारने जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींसह बहुतेक उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी दर कमी केले आहेत. पूर्वी विमा पॉलिसींवर १८% जीएसटी लागू होता आणि आजपासून त्या करमुक्त झाल्या आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम लाखो विमा ग्राहकांवर होईल.