
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक त्यांच्या विशेष इम्पेरिया सेवेचे नियम बदलणार आहे. ही सेवा बँकेच्या निवडक ग्राहकांसाठी आहे. ज्यामध्ये अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत. नवीन नियम १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील. बँकेने त्यांच्या ग्राहकांना याबद्दल माहिती दिली आहे. या बदलाचा सर्वात मोठा भाग म्हणजे टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू (TRV) चा नवीन नियम, ज्या अंतर्गत ग्राहक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात एकूण 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम असणे आवश्यक आहे.