सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी सोनं तब्बल २१०० रुपयांनी वाढलं. यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३१ हजार ३०० रुपयांवर पोहोचलाय. तर चांदीनेही भाव खाल्लाय. चांदीच्या दरातही 2 हजार रुयांची वाढ झालीय. प्रति किलो चांदीचा दर एक लाख ९४ हजार रुपये इतका झालाय. तर एक किलो चांदीसाठी जीएसटी सह जवळपास २ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.