
"Right time, right move – Market Timing can make or break your stock market journey."
Sakal
पद्मनाभ वैद्य, शेअर बाजार अभ्यासक
व्यवहारात जगताना आपण विविध प्रकारचे निर्णय घेत असतो, त्या वेळी त्याची वेळ योग्य असावी असे बघतो. इतर धार्मिक कार्ये करताना, सोने खरेदी यासाठी आपण मुहूर्त काढतो किंवा शुभ दिवस बघतो आणि याउलट, पितृपक्ष, अमावस्या अशा दिवशी आपण या गोष्टी टाळतो. यामागील आपला हेतू हाच असतो, की चांगल्या दिवशी खरेदी केल्यास त्याचे भविष्यकालीन फळ सुखकर असू शकेल किंवा त्यादिवशी केलेल्या व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता वाढेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मात्र, आपण योग्य वेळ निवडण्याच्या पथ्याकडे विशेष लक्ष देत नाही आणि त्यामुळे बरेचदा आपली गुंतवणूक बाजार महाग असताना होते आणि त्यानंतर बाजार कोसळल्यावर आपल्याला तोटा होतो.