

FD rates
esakal
ICICI fixed deposit rates October 2026: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये १० बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने प्रामुख्याने दीर्घ मुदतीच्या निवडक ठेवींवरील व्याजदरात ही सुधारणा केली असून, याचा थेट लाभ ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य ठेवीदारांनाही होणार आहे.