
Income Tax Law About Cash
ESakal
जर तुम्ही अजूनही कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रोख रकमेचा वापर करत असाल, तर आता तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, जर कोणी २० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेतली किंवा दिली तर तो कायदा मोडल्याचा गुन्हा ठरू शकतो. जर पकडले गेले तर तुम्ही रोख रक्कम दिली किंवा घेतली त्या रकमेइतकाच दंड आकारला जाईल.