

Simplified Taxation: Introduction of Form 121 Replacing 15G and 15H
Sakal
डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
पूर्वी करदात्यांना करकपात टाळण्यासाठी फॉर्म १५जी किंवा १५एच या दोन वेगवेगळ्या फॉर्मचा वापर वयानुसार करावा लागत होता. नव्या कायद्याच्या कलम ३९३(६) अंतर्गत हे दोन्ही फॉर्म एकत्रित करून फॉर्म क्रमांक १२१ सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. करकपात टाळणे हा यामागचा उद्देश आहे. ज्या करदात्यांचे एकूण अंदाजित उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यावर कोणताही कर लागू होत नाही, अशा करदात्यांना हा फॉर्म सादर करता येतो. एकदा हे प्रकटीकरण दिल्यानंतर संबंधित पेयरकडून टीडीएस कापला जात नाही, त्यामुळे अनावश्यक करकपात टाळता येते. हा बदल केवळ फॉर्मच्या नावापुरता मर्यादित नसून, त्यामध्ये प्रक्रिया सुलभीकरण, डिजिटल प्रणालीचा वापर आणि अनुपालन सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.