
India VS America
E sakal
डॉ. अपूर्वा जोशी, (सर्टिफाइड अँटी-मनी लॉँडरिंग एक्स्पर्ट आणि सर्टिफाइड बँक फॉरेन्सिक अकाउंटंट) apurvapj@gmail.com
मयूर जोशी, (चार्टर्ड अकाउंटंट-सीए )
joshimayur@gmail.com
अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याच्या हेतूने अनेक अडचणी उभ्या करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भारताची त्यात थोडी होरपळ होत असली, तरी एक सार्वभौम देश म्हणून भारत जो स्वतंत्र बाणा दाखवीत आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. भारताच्या सार्वभौमत्वाची कसोटीच जणू सध्या लागत आहे. मात्र, भारत सर्व अडथळ्यांवर मात करून आपले उद्दिष्ट साध्य करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.