

Ceasefire Boost! Indian Companies Gain Big as Exports Surge
eSakal
Indian Export Growth: अमेरिका-इराण युद्धातील शस्त्रसंधीचा फायदा घेण्यासाठी भारतीय कंपन्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक कंपन्या निर्यात पुन्हा सुरू करत आहेत. मागील एक महिन्याच्या काळात युद्धग्रस्त देशांमध्ये मोठे नुकसान झाले असून आता पुनर्बांधणी सुरू होईल त्यामुळे येत्या काळात ऑर्डर्स वाढतील. सध्याच्या माहितीनुसार औषधनिर्माण कंपन्यांनी निर्यातीच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले आहे, कारण युद्धग्रस्त देश आपला औषधांचा साठा पुन्हा भरू पाहत आहेत.