Premium|India economy turning point 2026 : जागतिक रेटिंग संस्थांकडून भारताला 'थम्स अप'; गुंतवणुकीचा खर्च घटणार आणि कॉर्पोरेट नफ्यात मोठी वाढ होणार

India Sovereign Rating Upgrade 2026 : जागतिक मानांकन संस्थांनी भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढणार असून, ६.५ ते ७ टक्के विकासदरासह २०२६ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक 'टर्निंग पॉइंट' आणि प्रगतीची मोठी संधी ठरणार आहे.
India economy turning point 2026

India economy turning point 2026

esakal

Updated on

गौरव बोरा - gauravbora89@gmail.com

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी २०२६ हे वर्ष एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरताना दिसत आहे. भारताचा सातत्यपूर्ण ६.५ ते ७ टक्क्यांचा विकासदर आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा अपेक्षेपेक्षा सरस नफा पाहून जागतिक मानांकन संस्थांनी आता भारताच्या मानांकनात (रेटिंग) सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय बाजारांकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. याच्या सकारात्मक परिणामांचा वेध.

एखादी जागतिक मानांकन (रेटिंग) संस्था जेव्हा एखाद्या देशाचे मानांकन वाढवते, तेव्हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी तो देश अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. मानांकन वाढविण्याचा अर्थ असतो-

गुंतवणुकीचा खर्च कमी होणार : मानांकन सुधारल्यामुळे भारतीय सरकार आणि कंपन्यांना परदेशातून कमी व्याजदराने कर्ज मिळणे शक्य होईल, ज्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होईल.

जागतिक निर्देशकांमध्ये वजन वाढणार : ‘जेपी मॉर्गन’सारख्या जागतिक बाँड आणि इक्विटी इंडेक्समध्ये भारताचा वाटा वाढेल, ज्यामुळे आपोआप परकी गुंतवणूक ओढली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com