

US Tariffs Impact India Trade Numbers
Esakal
नवी दिल्ली, ता. १६: देशाची व्यापारी तूट जानेवारीमध्ये ३४.६८ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. डिसेंबरमध्ये ती २५.०४ अब्ज डॉलर होती. सोने आणि चांदीच्या वाढत्या आयातीमुळे व्यापारी तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारीमध्ये वस्तूंची निर्यात डिसेंबरमधील ३८.५१ अब्ज डॉलरवरून घसरून ३६.५६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली, तर आयात डिसेंबरमधील ६३.५५ अब्ज डॉलरवरून ७१.२४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली.