

India-UK FTA Starts July 15: Range Rover, Defender & Scotch Whisky Prices Set to Fall?
eSakal
Ind-Uk FTA Impact: भारत आणि इंग्लंड (UK) यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार 15 जुलै 2026 पासून अधिकृतपणे लागू होणार आहे. या करारामुळे ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या अनेक प्रीमियम उत्पादनांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः रेंज रोव्हर, लँड रोव्हर डिफेंडर यांसारख्या लक्झरी कार तसेच स्कॉच व्हिस्की आणि जिन ही उत्पादने भारतीय ग्राहकांना तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात.