India Unemployment Rate: देशातील बेरोजगारीचा दर 5.4 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांवर; ग्रामीण भागात घट, तर शहरांमध्ये वाढ

India's unemployment rate falls to 5.1 percent: जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीतील आकडेवारी, ग्रामीण बेरोजगारी 4.8 वरून 4.3 टक्क्यांवर; शहरी भागात दर 6.7 वरून 6.8 टक्क्यांवर, महिलांच्या रोजगार सहभागातही वाढ
India's unemployment rate falls to 5.1 percent in July September Quarter 2026

India's unemployment rate falls to 5.1 percent in July September Quarter 2026

esakal

Updated on: 

India unemployment rate July September 2026: देशातील बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीत भारतातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील बेरोजगारीचा दर 5.1 टक्क्यांवर आला आहे. मागील एप्रिल ते जून तिमाहीत हा दर 5.4 टक्के होता. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी झाल्यामुळे एकूण बेरोजगारीच्या दरात सुधारणा झाल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) मंगळवारी जाहीर केलेल्या नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणाच्या (PLFS) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...