Bank Minimum Balance
ESakal
Sakal Money
Minimum Balance: आनंदाची बातमी! किमान बँक बॅलन्स राखण्याचा त्रास संपला, आता 'या' बँकेत कोणताही दंड आकारला जाणार नाही
Bank Minimum Balance News: खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. किमान बँक बॅलन्स राखण्याचा त्रास संपला आहे. आता 'या' बँकेत कोणताही दंड आकारण्यात येणार नाही आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी किमान सरासरी शिल्लक (MAB) दंड माफ केला आहे. बुधवारी जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ओव्हरसीज बँकेने म्हटले आहे की, आतापासून बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. बँकेने काही योजनांसाठी किमान शिल्लक शुल्क आधीच माफ केले आहे.

