रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

Rupee Crashes 79 Paise Falls अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७९ पैशांनी कोसळला आणि ९५.२८ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर स्थिरावला. अमेरिकी डॉलरचे बळकट होणे आणि मोठ्या प्रमाणावर परकी भांडवल काढून घेतल्यानेही रुपयावर दबाव आला.
Rupee Falls to 95 Per Dollar

Rupee Falls to 95 Per Dollar

Esakal

Updated on

Why Is Indian Rupee Falling Against Dollar अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील शांतता प्रस्तावावर इराणने दिलेला प्रतिसाद फेटाळून लावल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. याचा परिणाम म्हणून, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७९ पैशांनी कोसळला आणि ९५.२८ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर स्थिरावला. नागरिकांनी सोन्याची खरेदी टाळावी आणि काटकसरीच्या उपायांचा अवलंब करावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे बाजारातील वातावरणाला आणखी एक धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com