

India’s Market Capitalisation vs GDP – What Buffett Indicator Signals
Sakal
किरांग गांधी (अनुभवी आर्थिक मेंटॉर)
भारतातील शेअर बाजार भांडवल ते ‘जीडीपी’ गुणोत्तर, ज्याला आपण ‘बफेट इंडिकेटर’ म्हणूनही ओळखतो, तो इतिहासातील उच्चांक गाठत आहे. शेअर बाजाराचे एकूण मूल्य देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा वर जात असताना गुंतवणूकदारांपासून ते धोरणकर्त्यांपर्यंत सर्वजण हाच प्रश्न विचारत आहेत, की आपण एका दीर्घकालीन तेजीची सुरुवात पाहत आहोत, की संभाव्य मंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत?