

Easing Inflation Signals Economic Relief Ahead
sakal
-गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
गेल्या तीन महिन्यांत देशातील ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई सातत्याने कमी राहिली आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर ०.७ टक्के, ऑक्टोबरमध्ये ०.३ टक्के, तर सप्टेंबरमध्ये १.४४ टक्के होता. सामान्यतः महागाई कमी असणे चांगले मानले जाते. मात्र, विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी अतिशय कमी महागाईही धोक्याचा इशारा असते, कारण ती बाजारातील मागणी कमकुवत असल्याचे संकेत देते. भारताच्या बाबतीत सध्या तेच चित्र दिसत आहे.