
Infosys Buyback: Major Share Repurchase Announced
Sakal
सुहास राजदेरकर - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
इन्फोसिस कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुन:र्खरेदी (बायबॅक) करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘बायबॅक’ची किंमत आहे एका शेअरमागे १,८०० रुपये. मागील नऊ वर्षांमधील कंपनीचे हे पाचवे आणि आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे ‘बायबॅक’ आहे. इन्फोसिस कंपनीने, गुरुवारी (ता. ११) ‘बायबॅक’ जाहीर केले त्यावेळी एका शेअरचा बाजारभाव होता १५०० रुपये. म्हणजेच १९ टक्के प्रीमियम मिळणार आहे.