

Infosys Share Buyback 2025: Key Dates and Price
Sakal
सुहास राजदेरकर (ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार)
इन्फोसिस कंपनीने सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेली त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) २० नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, ती २६ नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. ‘बायबॅक’ची किंमत आहे एका शेअरमागे १,८०० रुपये. मी माझ्याकडील शेअर ‘बायबॅक’साठी देऊ शकतो का? द्यावेत का? किती द्यावेत? त्यावर प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स किती लागेल? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असणे साहजिकच आहे.