

Big Relief for Insurance Customers as New Benefits and Reforms Arrive
sakal
-ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
सरकारने परदेशी विमा कंपन्यांना दिलेल्या मंजुरीमुळे आणि ‘आयआरडीएआय’ने हाती घेतलेल्या डिजिटल सुधारणांमुळे, भारतातील विमाधारकांसाठी आता सुवर्णकाळ येणार आहे. परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत थेट प्रवेश मिळाल्यामुळे केवळ भांडवलच येणार नाही, तर जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान भारतात येईल. परदेशी कंपन्यांकडे असलेला प्रदीर्घ अनुभव भारतीय विमा कंपन्यांना त्यांच्या ‘जोखीम मूल्यांकन’ पद्धती सुधारण्यास मदत करेल. याचा थेट परिणाम विम्याचे हप्ते अधिक तर्कसंगत आणि परवडणारे होण्यात होईल.