Property Investment Tips : प्रॉपर्टीमध्ये Investment करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी, पैसे अडकणार नाहीत याकडे द्या लक्ष

तज्ञांच्या मते प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात ही गुंतवणूक करत असताना काही गोष्टींची काळजीपूर्वक पडताळणी करणं गरजेचं असतं
प्राॅपर्टीतली गुंतवणूक
प्राॅपर्टीतली गुंतवणूकEsakal
Updated on

भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण गुंतवणूक Investment करण्यावर भर देऊ लागले आहेत. पैसा वाढवण्यासाठी तो गुंतवणं गरजेचं असल्याच अनेकांच्या लक्षात आल्याने वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक वाढू लागली आहे. Know before investing in Property to save and safeguard your money

गुंतवणूक करत असताना काही जण स्टॉक मार्केटसारखे Stock Market जोखिम असलेले पर्याय निवडतात. तर काहीजण सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक Invesment करून जोखिम घेणं टाळतात. तसचं अनेकजण गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी Property खरेदी करतात.

तज्ञांच्या मते प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात ही गुंतवणूक करत असताना काही गोष्टींची काळजीपूर्वक पडताळणी करणं गरजेचं असतं.

कागदपत्रांची पडताळणी- जर तुम्ही प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असाल, तर सर्वप्रथम कागदपत्रं नक्की तपासून घ्या. तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही कायदेशीर कचाट्यात अडकलेली मालमत्ता विकत घेऊ नका.

शिवाय मालमत्ता खरेदी करताना प्रत्येक कागदपत्र आणि दस्तावेज सांभाळून ठेवा. कोणत्याही तोंडी आश्वासनांऐवजी लेखी व्यवहारांवर खास करून कायदेशीर कागदपत्रांवरील व्यवहार करण्यावर भर द्या.

प्रॉपर्टीची किंमत- तुम्ही ज्या परिसरामध्ये मालमत्ता खरेदी करत आहात या भागातील प्रॉपर्टीचे दर आधी जाणून घ्या. अनेकदा एकाच परिसरामध्ये प्रॉपर्टीचे वेगवेगळे दर पाहायला मिळतात.

एखाद्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही जास्त किंमत तर देत नाहीत ना, हे पाहणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

प्राॅपर्टीतली गुंतवणूक
PROPERTY TODAY: पुण्यात घर केवळ १७ लाखांपासून सुरु ; तुमच्या हक्काचं घर रोहन आनंद

कायदेशीर दस्तावेज- प्रॉपर्टी खरेदी करताना तिचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. रजिस्टेशनमुळे कायदेशीररित्या ती मालमत्ता तुमची होते आणि सरकार दरबारी त्याची नोंदही होते. यासाठी कायदेशीर दस्तावेजांची पूर्तता करतानाही काळजी घेणं गरजेचं आहे.

खास करून ज्या व्यक्तीकडून तुम्ही मालमत्ता खरेदी करत आहात त्या व्यक्तीने कायदेशीररित्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे का हे पडताळून पाहणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

प्राॅपर्टीतली गुंतवणूक
Sakal Property Today : व्यवसायानुरूप कमर्शिअल जागा कशी निवडाल?

मालमत्ता खरेदी करताना घ्यायची इतर काळजी

तज्ञांच्या मते जरी तुम्ही गुंतवणूकीसाठी एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तरी घाई गडबड करू नये. संयम राखून किमान १० प्रॉपर्टी पाहून मगच योग्य मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घ्या.

मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना थोडा अभ्यास आणि रिसर्च करणं गरजेचं आहे. यासाठी योग्य किंमत आणि लोकेशन पाहणं गरजेचं आहे. येत्या काळात तिथे किती विकास होईल याचा अंदाज बांधणं गरजेचं आहे.

मालमत्ता खरेदी करताना भविष्यात तिच्या दरात किती वाढ होवू शकते. इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत मालमत्तेतून जास्त नफा होईल याचा विचार करून ती खरेदी करावी.

अशा प्रकारे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य मालमत्तेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com