Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये? मग हे आहेत बेस्ट पर्याय

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं, भविष्यात त्यांच्या शिक्षणासाठी Education किंवा अडीअडचणींसाठी पुरेसा पैसा असावा याची चिंता असते. खरं तर घरात मुलं जन्माला आल्यानंतर लगेचच आई-वडिलांना त्याच्या भविष्याची Childrens Future तरतूद करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात
मुलांसाठी गुंतवणूक
मुलांसाठी गुंतवणूकEsakal

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं, भविष्यात त्यांच्या शिक्षणासाठी Education किंवा अडीअडचणींसाठी पुरेसा पैसा असावा याची चिंता असते. खरं तर घरात मुलं जन्माला आल्यानंतर लगेचच आई-वडिलांना त्याच्या भविष्याची Childrens Future तरतूद करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. Marathi Investment Tips How to secure children Future through right investment

अशावेळी अर्थातच प्रत्येकजण चांगले रिटर्न्स म्हणजेच परतावा मिळेल असे गुंतवणूकीचे पर्याय Investment Options शोधत असतात. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असताना अनेकदा ती दीर्घकाळासाठी असल्याने कमी जोखीम असेल मात्र चांगला परतावा Investment Returns मिळेल अशा सुरक्षित पर्यायांचा शोध सुरू होतो.

इथे तुमची मदत करण्यासाठी आम्ही असेच काही पर्याय तुम्हाला सांगणार आहोत ज्यात प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक केल्यास काही वर्षांनी तुम्हाला चांगले रिटर्नस मिळू शकतात.

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड PPF- दीर्घ कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. PPF चा कालावधी हा १५ वर्षांचा असतो. तसंच त्या पुढे प्रत्येकी ५ वर्षांसाठी तुम्ही हा मॅच्युरिटी काळ वाढवू शकता.

PPFमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एखाद्या बँकेमध्ये किंवा पोस्टात PPF खातं सुरू करू शकता. सध्या पीपीएफ खात्यातील गुंतवणूकीवर ७.१ टक्के व्याज दिलं जातं. त्यामुळेच जर तुम्ही मुलं लहान असतानाच PPFमध्य गुंतवूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

हे देखिल वाचा-

मुलांसाठी गुंतवणूक
Investment Tips: योग्य Investment करायचीये? मग सोने खरेदी की स्टॉक मार्केट, कोणता पर्याय फायदेशीर?

सुकन्या समृद्धी योजना- जर तुम्हाला मुलगी असले तर तिच्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करू शकता. १० वर्षांच्या आतील मुलीसाठी तिचे पालक कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेमध्ये खात उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

खास बाब म्हणजे तुम्ही या योजनेत वर्षाला कमीत कमी केवळ २५० रुपये देखील गुंतवू शकता. तर वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही या योजनेत दीड लाख रुपये गुंतवणूक करू शकता. ही योजनेची म्यॅच्युरिटी २१ वर्षांनी होत असली तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तुम्ही तिच्या शिक्षणासाठी या खात्यातून काही रक्कम काढू शकता. या योजनेत ८ टक्के चक्रवाढ व्याज मिळतं.

हे देखिल वाचा-

मुलांसाठी गुंतवणूक
Investment Tips : उत्पन्न कमी असलं म्हणून काय झालं ? तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश ?

SIP- मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असताना तुम्ही म्युच्युअल फंडचा पर्याय निवडू शकता. यामध्ये SIP हा एक चांगला पर्याय आहे. SIP हा म्युचल फंडमधील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. SIPमध्ये तुम्ही महिन्याला केवळ १०० रुपये देखील गुंतवू शकता.

दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात SIP स्टॉक मार्केटशीच जोडली गेलेली स्किम असल्याने यातील रिटर्न्स किंवा व्याजाचे आकडे स्थिर नसले तरी तज्ञांच्या मते साधारण SIP तील गुंतवणूकीवर १२ टक्के व्याज मिळू शकतं.

फिक्स डिपॉझिट FD- फिक्स डिपॉझिटला अनेक लोक आजही सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहतात. बचत खात्याच्या तुलनेत यामध्ये जास्त व्याज मिळतो. तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात FD सुरू करू शकता.

FDतुम्ही अवघ्या ७ दिवसांच्या काळापासून ते १० वर्षांसाठी करू शकता. शिवाय गरज भासल्यास तुम्ही FD मोडून त्यातून काही रक्कम काढू शकता. प्रत्येक बँकेचे FDचे व्याज दर वेगवेगळे असले तरी दीर्घकाळासाठी FDमधून चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

अशा प्रकारे मुलांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीच्या या काही पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना जास्त परतावा मिळण्याचा मोह टाळून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणं जास्त योग्य ठरतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com