

Shiv Sagar Success Story: Arrived in Mumbai at 13 With Just ₹35, Started by Cleaning Floors, Now Built a ₹111 Crore Restaurant Brand
eSakal
Business Success Story: आज मुंबईमध्ये शिव सागर हा एक प्रसिद्ध रेस्टॉरंट ब्रँड म्हणून ओळखला जातो. पावभाजीपासून पिझ्झा आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण या रेस्टॉरंटमध्ये जातात. मात्र, या मोठ्या ब्रँडची सुरुवात एखाद्या आलिशान हॉटेलमधून किंवा मोठ्या गुंतवणुकीतून झालेली नाही. तर त्यामागे आहे केवळ 13व्या वर्षी सुरू झालेला नारायण टी. पुजारी यांच्या जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास. फरशी घासण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शिव सागर रेस्टॉरंट ब्रँडपर्यंत पोहचला आहे.