
शिरीष देशपांडे - सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
झपाट्याने वाढणारा शेअर बाजार, चांगल्या कंपन्यांचे एकामागोमाग येणारे आयपीओ आणि त्यांच्या शेअरमध्ये नोंदणीनंतर होणारी घसघशीत वाढ, यामुळे अलीकडच्या काळात ‘आयपीओ’मधील गुंतवणूक खूप प्रमाणात वाढली आहे. याचाच फायदा घेऊन सायबर चोरटे गुंतवणूकदारांना हेरून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.