Iran petrol price
ESAKAL
इराणमध्ये जास्त पेट्रोल वापरणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आता मोठा फटका बसणार आहे. सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करणाऱ्यांसाठी इंधनाचा दर थेट दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, देशात आधीच महागाईचा मोठा प्रश्न असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोलचे दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहेत. मात्र, पेट्रोलचा वाढता वापर आणि देशासमोर असलेल्या आर्थिक अडचणी पाहता सरकारने आता जास्त इंधन वापरणाऱ्यांकडून अधिक पैसे वसूल करण्याची तयारी केली आहे.