
भूषण गोडबोले
अलंकार, आभूषणे अर्थात दागिने तेही सोने-चांदी, हिरे, मोती, पाचू, माणिक अशा विविध रत्नांचे दागिने भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गुंतवणूक पर्याय म्हणूनही दागिन्यांकडे पाहिले जाते. सोन्याच्या दागिन्यांमधील गुंतवणूक हा पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. सण-उत्सव, लग्नसराई आणि शुभमुहूर्तावर दागिने खरेदीची पूर्वापार परंपरा आहे. त्यामुळे दागिन्यांच्या क्षेत्रात कायम मागणी असते. अलीकडच्या काळात आधुनिक डिझाइन आणि ब्रँडेड दागिन्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या बाजाराचा वेगाने विस्तार होत आहे. या क्षेत्रातील काही लखलखते शेअर गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम आहेत.