

jio platforms .
esakal
Jio Platforms Limited (JPL) ही भारतातील सर्वात मोठी डिजिटल कनेक्टिव्हिटी कंपनी आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या संशोधन अहवालांनुसार, कंपनीच्या विकासाचा पुढील टप्पा अधिक मोठा ठरू शकतो. 21 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 30,213 कोटी रुपयांच्या JPL IPO च्या पार्श्वभूमीवर GEPL Capital, Ventura Securities आणि SMC Global यांच्या अहवालांमध्ये कंपनीच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये 2G ग्राहकांचे 4G/5G कडे स्थलांतर, घरगुती ब्रॉडबँड सेवा, एंटरप्राइज क्लाउड आणि AI तंत्रज्ञान तसेच जिओने विकसित केलेले तंत्रज्ञान परदेशातील दूरसंचार कंपन्यांना विकणे या बाबींचा समावेश आहे.