Premium|Luxury Senior Living : सुखाचे चांदणे फुलविणारी ‘ज्युबिली’

Jubilee Senior Living : वाढते आयुर्मान आणि बदलत्या कुटुंबव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजसी धारिया यांच्या 'ज्युबिली : लक्झरी सीनियर लिव्हिंग' उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आनंदी जीवनाचा नवा पर्याय उभा केला आहे.
Luxury Senior Living

Luxury Senior Living

esakal

Updated on

प्रसाद घारे - prasad.ghare@gmail.com

वाढते आयुर्मान, बदलती कुटुंबव्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन यामुळे ‘सीनियर लिव्हिंग’ ही संकल्पना भारतात वेगाने आकार घेत आहे. पुण्यातील तरुण डॉक्टर डॉ. राजसी धारिया यांनी ही गरज ओळखून ‘ज्युबिली : लक्झरी सीनियर लिव्हिंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जावे, या उद्देशातून उभ्या राहिलेल्या या स्टार्ट-अपने आज अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे. त्याची ही यशोगाथा...

कर्वेनगरमधील ताथवडे उद्यानात मला रोज सकाळी टी-शर्ट, पँट, टोपी आणि गॉगल असा पेहराव केलेले एक ९३ वर्षीय ‘तरुण’ आजोबा भेटतात. विशेष म्हणजे ते दुचाकीवरून बागेत येतात. आल्यानंतर जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारतात, थोडा व्यायाम करतात आणि आजूबाजूच्या लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारतात. संभाषणात ते समोरच्याचे वय विचारतात आणि अभिमानाने सांगतात, ‘‘मी ९३ वर्षांचा आहे.’’ त्यांचा उत्साह पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. असेच ८०, ८५, ९० आणि अगदी १०० वर्षांचे आजी-आजोबा पर्वती, तळजाई, चतुःशृंगी, वेताळ टेकडी, एआरएआय टेकडी किंवा सिंहगडावर नियमित फिरताना दिसतात. काही जण टिळक टँक, एस. पी. कॉलेज किंवा पेगॅसिस येथे पोहताना, तर काही विद्यापीठ परिसरात सायकल चालवताना किंवा धावताना दिसतात. काही जिममध्ये व्यायाम करतात, तर काही नातवंडांसोबत झुम्बा किंवा रॉक डान्स करताना आढळतात. हे सारे ज्येष्ठ नागरिक मंगेश पाडगावकरांच्या ‘म्हातारपणावरचं तरुण गाणं’ जगताना दिसतात. हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे चांदणे फुलविणाऱ्या एका स्टार्ट-अपची ओळख करून घेणार आहोत. या स्टार्ट-अपची संस्थापक आहे एक तरुण एमबीबीएस डॉक्टर डॉ. राजसी धारिया.

राजसी यांनी पुण्यातून एमबीबीएस, जयपूर येथून हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये एमबीए (सुवर्णपदक) आणि अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून सीनियर लिव्हिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्या इंडियन अॅकॅडमी ऑफ जेरियाट्रिक्सच्या आजीवन सदस्य असून, २०२२ मध्ये त्यांना ‘बिझनेस वर्ल्ड हेल्थकेअर ४० अंडर ४०’ हा सन्मान मिळाला आहे. विविध नामांकित रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षक आणि रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रातील सात-आठ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी सहकारी शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने ‘ज्युबिली : लक्झरी सीनियर लिव्हिंग’ची स्थापना केली. हा पारंपरिक वृद्धाश्रम नाही. कारण म्हातारपण हा आजार नसून, आयुष्याचा एक टप्पा आहे. हा टप्पा आनंदाने आणि सन्मानाने जगता यावा, ही या उपक्रमामागील मूलभूत संकल्पना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com