करकायदा : ई-लेखापुस्तकांचा बॅकअप भारतातच...

डिजिटल लेखापुस्तकांचा दररोज बॅकअप भारतातील सर्व्हरवर अनिवार्य; नियम ४६(८)मुळे डेटा रेसिडेन्सी, पडताळणी व करपालनासाठी नवी कायदेशीर जबाबदारी
Businesses using Tally, Zoho Books, ERP or other accounting software should review their backup and data residency policies to ensure tax compliance.

Businesses using Tally, Zoho Books, ERP or other accounting software should review their backup and data residency policies to ensure tax compliance.

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

प्राप्तिकर नियम २०२६ मधील नियम ४६(८) नुसार, एक एप्रिल २०२६ पासून डिजिटल लेखापद्धतीत नोंदी ठेवणाऱ्या सर्व करदात्यांसाठी टॅलीप्राइम, झोहो बुक्स, क्विक बुक्स, ईआरपी सिस्टिम किंवा कस्टम बिल्ट अकाउंटिंग प्लॅटफॉर्मसारख्या किंवा इतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन होणाऱ्या आर्थिक नोंदींचा दररोज बॅकअप घेणे आणि तो प्रत्यक्षात भारतात भौतिकरीत्या स्थित सर्व्हरवर साठविणे बंधनकारक आहे. क्लाउडवर भारतातून प्रवेश करता येतो किंवा क्लाउड प्रदाता भारतातून सर्व्हिस देत असल्याचे दाखविणे पुरेसे ठरणार नाही; आवश्यक बाब म्हणजे बॅकअप प्रत त्याचवेळी भौतिकरीत्या भारतातील सर्व्हरवर असणे गरजेचे आहे. त्यामुळे जागतिक क्लाउड सेवा वापरणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या सेवाकरारातील डेटा रेसिडेन्सी आणि सर्व्हर लोकेशनच्या अटीची तपासणी करणे सर्वांना अनिवार्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com