
मुंबई : नवे आर्थिक वर्ष तसेच नवा महिना सुरु होताच अनेक ठिकाणच्या नियमावलीमध्ये बदल होतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने येत्या ३० सप्टेंबरनंतर एटीएममधून ५०० रुपयांची नोट पुरवणे बंद करण्याचे आदेश दिल्याचा मेसेज व्हायरल झाला. यामुळे खरंच ५०० रुपयांची नोट एटीएममधून मिळणं बंद होणार, याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच लोकांनाही असा प्रश्न पडला असून याबाबत सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.