

Attractive Market Levels Signal Long-Term Investment Chance
Sakal
-गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय शेअर बाजार गेल्या काही काळापासून अस्थिर राहिला असला, तरी ‘निफ्टी’ निर्देशांकाचे मूल्यांकन आता ऐतिहासिकदृष्ट्या कमी पातळीवर आले आहे. ही पातळी केवळ मागील तीन वर्षांतील सर्वांत कमी नाही, तर ती गेल्या पंधरा वर्षांच्या सरासरीपेक्षाही खाली आहे. याचाच अर्थ भारतीय शेअर आता गुंतवणुकीसाठी अतिशय आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे.