
डॉ. वीरेंद्र ताटके
आर्थिक निर्णय घेताना तर्कसंगत विचार करणे ही एक कला आहे आणि सरावाने आपण ही कला शिकू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपली मनःस्थिती ढळू न देता शांतपणे आणि समंजसपणे योग्य निर्णय घेणे म्हणजे तर्कसंगत विचार करणे होय. आपल्या रोजच्या जगण्यावागण्यात आपण असे अनेक तर्कसंगत निर्णय घेत असतो मात्र, आर्थिक निर्णय घेताना अनेकदा या तर्कसंगत विचारांची सवय आपण सोडून आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो.