

Meesho’s Growth in NMV and User Base
Sakal
नंदिनी वैद्य ( ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
शेअर बाजार
मीशो लि. या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री योजना अर्थात ‘आयपीओ’ तीन डिसेंबरपासून पाच डिसेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रतिशेअर १०५ ते १११ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यत आला आहे. हा आयपीओ ५४२० कोटी रुपयांचा असून, नोंदणीनंतर ५० हजार कोटी रुपयांच्या घरात बाजारमूल्य होईल. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या बहुतांश सर्वांनाच हा प्लॅटफॉर्म माहिती आहे. खरेदीदार, विक्रेते, लॉजिस्टिक पार्टनर आणि कंटेंट क्रिएटर या महत्त्वाच्या चार घटकांना एकत्रित करून हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालविला जातो.