

The ICICI Prudential Multi Asset Active Fund of Funds aims to balance risk and returns with dynamic asset allocation and periodic rebalancing.
Sakal
अमित भंडारी, संचालक, पारस प्राइम वेल्थ प्रा.लि.
शेअर (इक्विटी), डेट आणि सोने या तिन्ही मालमत्ता वर्गांमध्ये एकत्रित गुंतवणूक करणे ही चांगली कल्पना आहे. मात्र, ती स्वतः व्यवस्थापित करणे वेळखाऊ आणि किचकट ठरू शकते. प्रत्येक मालमत्ता वर्गासाठी स्वतंत्र फंड निवडणे, त्यांच्या कामगिरीवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि बाजारातील बदलांनुसार गुंतवणुकीचे प्रमाण बदलणे आवश्यक असते. मल्टी ॲसेट फंड ऑफ फंड्स ही सर्व प्रक्रिया एका गुंतवणुकीत सुलभपणे हाताळतो.