

Gift a Mutual Fund: Now Easier Than Ever for Investors
Sakal
प्रसाद भागवत,ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
म्युच्युअल फंड नियंत्रक ‘ॲम्फी’ने नुकतेच एक नवे परिपत्रक जारी करून, डी-मॅटमध्ये नसलेले, पारंपरिक कागदी स्टेटमेंट असलेले म्युच्युअल फंडांचे युनिट दुसऱ्याच्या नावे वर्ग करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. या परिपत्रकानुसार, जवळच्या नातेवाइकांना वा भावडांना किवा त्रयस्थ व्यक्तीलादेखील आपल्या नावावरील डी-मॅट नसलेले युनिट सुलभपणे हस्तांतरित करता येतील. सर्व निवासी, अनिवासी भारतीय या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. अपवाद म्हणून ‘एनआरई’ प्रकारात फोलिओधारक असलेल्या ‘एनआरआय’ लोकांना आणि अज्ञान धारकाच्या नावे असलेल्या फोलिओंना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. ‘लॉक-इन’ असलेले, गोठविलेले, वा तारण युनिटही या प्रकारे वर्ग करता येणार नाहीत.