

The Importance of Patience in Sectoral Mutual Funds
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके (गुंतवणूक विषयाचे अभ्यासक)
रमेश आणि महेश दोघेही जिगरी मित्र. कोणताही निर्णय एकमताने घेणारे. दहा वर्षांपूर्वी या दोन मित्रांनी म्युच्युअल फंडात एकरकमी मोठी गुंतवणूक करायची ठरवलं. त्यांच्या सल्लागाराने त्यांना यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड सुचवला. हा एक क्षेत्रीय अर्थात सेक्टोरल फंड आहे, असं सांगून त्यातील संभाव्य जोखीमही समजावून सांगितली. यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर फंड पायाभूत सुविधांसंबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. यामुळे, पायाभूत सुविधा क्षेत्राने खराब कामगिरी केली, तर संपूर्ण फंडाच्या कामगिरीवर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याची जाणीवदेखील सल्लागाराने दोघांना करून दिली. अर्थात, पायाभूत सुविधा विकास हा भारत सरकारचा मुख्य अजेंडा आहे, त्यामुळे दीर्घकाळात हा फंड उत्तम कामगिरी करेल, असे सांगून साधारण दहा वर्षांसाठी गुंतवणूक करावी, असे सल्लागाराने सुचवले.