

Investment Trials That Shaped My Financial Thinking
esakal
-विक्रम अवसरीकर, फायनान्शिअल प्लॅनर
सुमारे पाच वर्षांपूर्वी मी एक प्रयोग करून बघायचे ठरवले. कोविड महासाथीनंतरच्या काळात शेअर बाजार वाढत चालला होता. बँकिंग आणि फार्मा क्षेत्र तेजीत होते. तेव्हा मी एकूण चार म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सुरू करण्याचे ठरवले. निप्पॉन बँकिंग, निप्पॉन फार्मा, निप्पॉन मल्टी कॅप आणि पराग पारीख फ्लेक्सि कॅप अशा चार फंडांमध्ये पाच वर्षांसाठी समान रकमेची ‘एसआयपी’ सुरू केली. या गुंतवणुकीतून आता पाच वर्षांनी काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले.