Maruti Suzuki Merger
ESakal
Sakal Money
Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता
Maruti Suzuki Merger: एनसीएलटीने मोठी मान्यता दिली आहे. गुजरातमधील एक ऑटो कंपनी मारुती सुझुकी इंडियामध्ये विलीन होणार आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) ने देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती इंडियासोबत सुझुकी मोटर गुजरातचे विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. दिल्लीतील NCLT च्या प्रमुख खंडपीठाने दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त याचिकेला मंजुरी दिली. हे विलीनीकरण भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

