New India Cooperative Bank Fraud: रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. १३ फेब्रुवारीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना आता या बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असणार आहेत, या काळात रिझर्व्ह बँकेकडून या बँकेच्या आर्थिक स्थितीची पडताळणी केली जाणार आहे. अशातच आता बँकेच्या मॅनेजरने १२२ कोटी रुपयांचा अपव्यवहार केल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.