

New Labour Code 2026: Major Changes in Salary, Work Hours and Overtime from April 1
esakal
देशभरातील कर्मचारी वर्गासाठी १ एप्रिल २०२६ ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी नियम जवळजवळ अंतिम केले आहेत. यामुळे पगार, ओव्हरटाईम, दैनंदिन कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या मूलभूत बाबींमध्ये आमूलाग्र बदल होतील. या बदलांचा प्रत्यक्ष परिणाम लाखो कर्मचारी आणि कंपन्यांवर होणार असल्याने उद्योग क्षेत्रात नवी चर्चा सुरू झाली आहे.